माणसाच्या जीवनाविषयी वयस्कर माणसांकडून अनेकदा असे बोलणे आपण ऐकले असेल.कटू असले तरी हे जीवनाचे सत्य आहे कारण मृत्यू हाच विश्वातील सर्वात मोठा आविष्कार आहे.
आपल्यापैकी अनेक लोकांवर आपल्या बायको-मुलांची, आई-वडिलांची, भावंडाची जबाबदारी असते.दुर्दैवाने आपला अकस्मात मृत्यू झाल्यास आपल्या कुटुंबीयांची भयंकर वाताहत होऊ शकते तेव्हा आपल्या पाठीमागे आपले आप्त-स्वकीय व्यवस्थित जीवन जगू शकतील अशी तजवीज करणे आपली जबाबदारी आहे.आपल्यामागे आपल्या कुटुंबाला सुरक्षित करण्यास आपल्याला मदत होते लाईफ इन्शुरन्सची.लाईफ इन्शुरन्सलाच आपण जीवन विमा असे देखील म्हणतो.
आरोग्य विमा: आजारपण, अपघात किंवा हॉस्पिटलायझेशनमुळे झालेल्या वैद्यकीय खर्चाचा समावेश होतो.
मोटार विमा: वाहनांना नुकसान, चोरी किंवा तृतीय-पक्षाच्या दायित्वांविरूद्ध संरक्षण प्रदान करते.
ट्रॅव्हल इन्शुरन्स: ट्रिप रद्द करणे, वैद्यकीय आणीबाणी, हरवलेले सामान इत्यादींसह प्रवासादरम्यान जोखमीपासून संरक्षण देते.
उत्तरदायित्व विमा: इतर लोकांना झालेल्या इजा किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान यापासून उद्भवणाऱ्या कायदेशीर दायित्वांपासून संरक्षण करते.